नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला बळी

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 21:27

पुण्यानंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. आता नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने पहिला बळी घेतला आहे. नंदू चव्हाण असं या मृत व्यक्तिचं नाव आहे.

मालेगावच्या निवडणुकीत धार्मिक रंग

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 13:48

मालेगाव महापालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागलाय. उन्हाचा पारा ४० अंशावर गेला असताना राजकीय मुद्देही तापू लागले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी जामीनावर सुटलेल्या आरोपींना समाजवादी पार्टीनं उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत धार्मिक रंग भरले जात आहेत.

धुळे-नंदूरबार जिल्हा बँक बरखास्त

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 12:08

धुळे नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. नाबार्डच्या शिफारशीवरुन आरबीआयनं ही कारवाई केली. जिल्हा बँकेवर तीन अधिका-यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बँ

विधानसभा कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 12:09

विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या कारणावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

तहानलेल्या हरणांचा गावात मृत्यू

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 07:56

राज्यात उन्हाचा पारा वाढत चाललाय. त्याचा परिणाम सर्वत्र जाणवू लागलाय. पण तापत्या उन्हानं तहानलेले जीव मात्र पाण्याच्या शोधात प्राण गमावत आहेत.

राज्यभरात रामनवमीचा उत्साह...

Last Updated: Sunday, April 1, 2012, 11:07

रामनवमीनिमित्त राज्यभरात भाविकांचा उत्साह दिसून येतोय. शिर्डी, नाशिकसह अनेक ठिकाणी आज रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

नाशिकमध्ये पाणीकपातीवरून राजकारण

Last Updated: Saturday, March 31, 2012, 17:46

नाशिकमध्ये पाणीकपातीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झालंय. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

पराभूत विजयी घोषित, उस्मानाबाद झेडपी त्रिशंकू

Last Updated: Saturday, March 31, 2012, 15:56

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मोहा गटाच्या मतमोजणीतील गोंधळाप्रकरणी जिल्हा न्यायालयानं शिवसेनेच्या पराभूत उमेदवार सविता कोरे यांना विजयी घोषित केलं आहे.

नाशिक शहरातून जकात हटवा मोहीम

Last Updated: Saturday, March 31, 2012, 08:12

नाशिक शहरातून जकात हटवा, अशी मोहीम जोरदार सुरू झालीय. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केलाय. जकातीच्या खाजगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागलेत.

नाशिकमध्ये ‘जकात हटवा’ मोहीम

Last Updated: Thursday, March 29, 2012, 22:38

नाशिक शहरातून ‘जकात हटवा’ मोहीम जोरदार सुरू झाली आहे. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केला आहे. जकातीच्या खाजगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागले आहेत.